खड्ड्यात पडली माही, शर्थीची प्रयत्न सुरू - Marathi News 24taas.com

खड्ड्यात पडली माही, शर्थीची प्रयत्न सुरू

www.24taas.com, दिल्ली
 
दिल्लीजवळच्या गुडगावमधील मनेसर भागात बोअरवेलमध्ये एक मुलगी पडली आहे. काल रात्री ही घटना घडली. बोअरवेलमध्ये पडलेल्या मुलीचं नाव माही असं असून काल तिचा वाढदिवस होता.
 
बोअरवेलमध्ये पडलेल्या या मुलीला काढण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत. मुलीपर्यंत ऑक्सिजन पोहचवण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. ७० फूट खोल खड्ड्यात कॅमेराही सोडण्यात आला आहे. कॅमेऱ्यानं बालिकेच्या हालचाली टिपल्यानं खड्ड्यात माईक सोडण्यात येणार आहे.
 
आता त्याबरोबर स्थानिक प्रशासन, एनएसजीची टीमही घटनास्थळी दाखल झाली आहे. यापूर्वीही बोअरवेलमध्ये मुलं पडण्याचे प्रकार घडले आहेत. अलिकडे या प्रकारांमध्ये मोठी वाढ झाली आहे. यानिमित्तानं उघड्या बोअरवेलचा मुद्दा पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
 
 
 
 

First Published: Thursday, June 21, 2012, 11:16


comments powered by Disqus