माहीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू - Marathi News 24taas.com

माहीचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू

www.24taas.com, ग़डगाव
 
चार दिवसांपासून बोलवेलच्या घड्यात अडकलेल्या माहीला बाहेर काढण्यात सुरक्षा दलाच्या जवानांना बाहेर काढण्यात यश आले तरी त्याच्यावर उपचार सुरू असताना डॉक्टरांना त्याला वाचविण्यास अपयश आले आहे. माहीच्या दुर्दैवी जाण्याने हळहळ व्यक्त होत होते आहे.
 
रविवारी १.३८ वाजता माहीला ७० फुट खड्यातून बाहेर सुखरूप काढण्यात आले. त्याला तात्काळ रूग्णालयात दाखल करण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू करण्यात येत होते. उपचार सुरू असताना चार वर्षीय माहीचे दुर्दैवी निधन झाले.
 
दोन दिवसांच्या अथक प्रयत्नांनंतर शनिवारी रात्री येथील खडकाळ जमीन फोडण्यात बचावपथकाला यश आले. त्यामुळे सदर कुपनलिकेला समांतर बोगदा खोदून माहीला आज रविवारी सकाळी बाहेर काढण्यात आले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली.
 
संबंधित बातमी
माहीची ८२ तासांनंतर सुखरूप सुटका

माहीची ८२ तासांनंतर सुखरूप सुटका
८२ तासांच्या अथक प्रयत्नानंतर चार वर्षीय माहीची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बुधवारपासून ७० फूट खोल कूपनलिकेत माही पडली होती. तिला बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाच्या जवानांनी प्रयत्नांची पराकाष्ठा केली.

First Published: Sunday, June 24, 2012, 15:16


comments powered by Disqus