केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाला आग - Marathi News 24taas.com

केंद्रीय गृहमंत्रालयाच्या कार्यालयाला आग

www.24taas.com, नवी दिल्‍ली
 
मुंबईत पाठोपाठ दिल्लीत गृहमंत्रालयात आग आगल्याने पळापळ झाली. आग विझविण्यासाठी अग्नीशमनच्या सहा गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही तासातच आग आटोक्यात आणण्यात अग्नीशमन दलाच्या जवानांना यश आले.
 
मुंबईतील मंत्रालयातील अग्नितांडवानंतर आता दिल्‍लीतही आगीने खळबळ उडाली आहे. यावेळी आगीच्‍या भक्ष्‍यस्‍थानी केंद्रीय गृहमंत्रालय पडले. राजधानीतील नॉर्थ ब्‍लॉक येथे गृहमंत्रालय आहे.  मंत्रालयाच्‍या दुस-या मजल्‍यावर आग लागली आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्‍या अनेक गाड्या घटनास्‍थळी दाखल झाल्‍यात. आज रविवारची सुटी असल्‍यामुळे कार्यालयात कर्मचारी नव्‍हते. त्यामुळे मोठी दुर्घटा टळली आहे.
 
ही आग शॉर्टशर्किटने लागली की अन्य कारणांनी लागली. याबाबत चौकशी सुरू आहे. दरम्यान, या आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही.

First Published: Sunday, June 24, 2012, 15:15


comments powered by Disqus