२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्याला अटक - Marathi News 24taas.com

२६/११ मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्याला अटक

www.24taas.com, नवी दिल्ली
 
२६/११ मुंबई हल्ल्यातील एका दहशतवाद्याला आज सोमवारी इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय या  दिल्लीच्या विमानतळावर अटक करण्यात आली आहे. आज सकाळी या दहशतवाद्याला स्पेशल सेलने पकडले.
 
दिल्ली विमानतळावर एक दहशतवादी आल्याची माहिती मिळताच स्पेशल सेलने सापला रचला होता. अटक करण्यात आलेला हा दहशतवादी इंडियन मुजाहिद्दीन आणि लश्कर-ए-तय्यबाचा सैयद जबीउददीन उर्फ अबू जिंदाल  तसेच अबू हमजा हा सदस्य असल्याचे सांगण्यात आले आहे. मुंबईतली २६/११ हल्ल्यात त्याचा हात असल्याचा आरोप आहे.
 
सैयद जैबुद्दीन उर्फ अबू हमजा याला सौदी अरबमधून अटक केल्यानंतर त्याला भारतात आणले गेले होते. त्यानंतर तो पाकिस्तानात पळून गेला होता. २००६पासून तो फरार होता. त्यामुळे या दहशतवाद्याकडून महत्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे.
 
व्हिडिओ पाहा

First Published: Tuesday, June 26, 2012, 09:49


comments powered by Disqus