Last Updated: Friday, December 30, 2011, 08:52
झी २४ तास वेब टीम, लंडन तुम्ही चॉकलेट खात आहात. आणि हो, चॉकलेटच्या आहारी गेलात. मात्र, तुमची सवय कायम आहे. जर तुम्हाला चॉकलेट खाणे कमी करायचे असेल तर त्यावर उपाय आहे चालने. किमान दररोज १५ मिनिटे जोरात चाललात तर चॉकलेट खाण्याची सवय अर्ध्यावर आणू शकता. नव्या संशोधनानंतर ही बाब स्पष्ट झाली आहे. चालण्याच्या सवयीमुळे आपण तणावपूर्ण जीवन जगू
शकतो.
ऑफिसमध्ये चॉकलेट खाण्याची सवयही आपण बदलू शकतो. हे संशोधनाने स्पष्ट झाले आहे. विज्ञानआधारित पत्रिका ‘एपेटाइट’च्या एका अहवालानुसार ते स्पष्ट झाले आहे. एक्सेटर विश्वविद्यालयाचे प्राध्यापक एडरियन टेलर यांनी सांगितले, कोर्यालयात काम करताना थकवा जाणवत असताना चॉकलेट खाण्याची सवय लागते. ती काहींना असते. या चॉकलेट
खाण्याच्या सवयीमुळे आपले वजनही वाढते. ते शरिराला धोकादायक आहे.
एक्सेटर विश्वविद्यालयाने याबाबत अभ्यास केला. नियमित चॉकलेट खाणाऱयां ७८ लोकांचा अभ्यास केला. ७८ लोकांचे दोन गट केले. त्यातील एका गटाला १५ मिनिटे चालयला सांगितले. त्यानंतर काही काम करण्यास सांगितले. तर दुसऱ्या गटाला त्यापेक्षा जास्त कठीण काम करण्यास सांगितले. त्याचबरोबर त्यांच्या टेबलावर चॉकलेट ठेवली.
संशोधकांनी आणखी दोन गटांना काम करण्यास सांगितले. परंतु काम करण्याच्या आधी त्यांना आराम करण्यास सांगितले. त्यानुसार पहिल्या दोन्ही गटांप्रमाणे दुसऱया गटांनाही काम करण्यास सांगितले. तसेच त्यांच्या टेबलावर चॉकलेट ठेवली. परंतु संशोधकांना लक्षात आले की, व्यायाम केलेल्यांनी दुसऱया दोन्ही गटांपेक्षा चॉकलेट खाल्लीत. त्यांच्या कामावर काहीही परीणाम झाला नाही. त्यामुळे चालने हा व्यायाम किती महत्त्वाचा आहे ते स्पष्ट होते.
First Published: Friday, December 30, 2011, 08:52