अर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधानांनी स्विकारला - Marathi News 24taas.com

अर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधानांनी स्विकारला

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार म्हणून प्रणव मुखर्जी यांनी राजीनामा दिल्यानंतर अर्थमंत्रीपदाचा पदभार पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी स्विकारला आहे. सध्या देशाची आर्थिक स्थिती अडचणीची असताना प्रणवदांनतर अर्थमंत्रीपदाची सूत्र कोणाच्या हाती जातात याबाबत उत्सुकता होती. अशा परिस्थीतीत अर्थतज्ञ असलेले पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी या खात्याची सूत्र स्वतःच्या हाती घेतली आहेत.
 
देशाला आर्थिक अडचणीतून सोडवण्यासाठी अर्थतज्ञ असलेल्या पंतप्रधानंकडून अनेक अपेक्षा बाळगल्या जातायत. कारण यापूर्वीही मनमोहन सिंग यांनी बिकट आर्थिक परिस्थितीतून देशाला सावरलं होतं. यापूर्वी 1991-92 आणि 1995-96 या कालावधीत केंद्रीय अर्थमंत्री म्हणून मनमोहनसिंग यांनी कार्यभार सांभाळला होता.
 
1991 मध्ये पी व्हि नरसिंहराव यांच्या मंत्रिमंडळात अर्थमंत्री असलेल्या मनमोहन सिंग यांनी अनेक आर्थिक सुधारणा करुन देशाला आर्थिक प्रगतीपथावर आणलं होतं. त्यामुळे आता पुन्हा एकदा बिकट आर्थिक स्थितीत अर्थमंत्रीपदाची सूत्र मनमोहनसिंग यांच्या हाती आल्याने आता अर्थविश्वात काय महत्त्वाचे निर्णय होतात याकडे साऱ्यांचं लक्ष लागलं आहे.

First Published: Wednesday, June 27, 2012, 15:44


comments powered by Disqus