Last Updated: Saturday, December 10, 2011, 13:02
झी २४ तास वेब टीम, कोलकाता एएमआरआय रुग्णालयाला आगीत ९० जण मृत्युमुखी पडले. यात ८५ रूग्ण तर ४ कर्मचारी आहेत. याप्रकणी सहा जणांना १० दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे.
कोलकाता येथील एएमआरआय रुग्णालयात शुक्रवारी लागलेल्या आग प्रकरणी रुग्णालयाच्या सहा संचालकांना दहा दिवसांसाठी पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश आज न्यायालयाने दिले.
रुग्णालयाच्या सहा संचालकांना अटक केली होती. आज त्यांना न्यायालयात हजर केले असता त्यांना कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. आजही रुग्णालयाच्या तळमजल्यात आग लागली होती. मात्र, त्यावर लगेच नियंत्रण मिळविण्यात आले. रुग्णालयाच्या सहा संचालकांमध्ये आर. एस. गोयंका, एस के तो़डी यांचा समावेश आहे.
शुक्रवारी पहाटे रुग्णालयाच्या तळमजल्यात सुरवातीला आग लागली आणि ती नंतर पसरत गेली. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी रुग्णालयाचे लायसन्स रद्द करण्याचे आदेश दिले आहेत. यापूर्वी तीन वर्षांपूर्वी याच रुग्णालयाला आग लागली होती.
First Published: Saturday, December 10, 2011, 13:02