राष्ट्रपतीपदाचे दावेदार; आज करणार अर्ज दाखल - Marathi News 24taas.com

राष्ट्रपतीपदाचे दावेदार; आज करणार अर्ज दाखल

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राष्ट्रपतीपदासाठी युपीएचे उमेदवार माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आणि विरोधी पक्षांचे उमेदवार पी.ए.संगमा आज उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत.
 
आज  सकाळी अकरा वाजता पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग आणि यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांच्यासह प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत माजी अर्थमंत्री प्रणव मुखर्जी आपला उमेदवारी अर्ज दाखल करतील. यूपीएतील घटक पक्ष असणाऱ्या राष्‍ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार,  द्रमूकचे टी. आर. बालू, नॅशनल कॉन्फरन्सचे फारुक अब्दुल्ला आणि इंडियन युनियन मुस्लिम लीगचे ई. अहमद यांनी प्रणवदांना पाठिंबा दिलाय. तर एनडीएमध्ये प्रमुख घटक पक्ष असणाऱ्या जेडीयू आणि शिवसेनेनंही प्रणवदांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतलाय.
 
दुसरीकडे, प्रणवदांचे प्रतिस्पर्धी असलेले विरोधी पक्षाचे उमेदवार पी. ए. संगमा हेदेखील आज अर्ज दाखल करतील. त्यामुळे प्रणवदा विरुद्ध संगमा अशी लढत होणार असली तरी प्रणवदांची निवड निश्चित असल्याच्या चर्चा आतापासूनच रंगू लागल्यात.
 
.
 

First Published: Thursday, June 28, 2012, 09:16


comments powered by Disqus