Last Updated: Saturday, December 10, 2011, 13:59
झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
काँग्रेसप्रणित यूपीए सरकारला अजित सिंह यांच्या राष्ट्रीय लोकदलाच्या निमित्ताने नवा साथीदार मिळाला आहे. राष्ट्रीय लोकदल आणि काँग्रेस यांच्यातील समझोत्यावर आज दिल्लीत शिक्कामोर्तब करण्यात आले.
उत्तर प्रदेशातील आगामी विधानसभा निवडणुकांच्या तोंडावर, लोकपालसह अन्य अनेक आघाड्यांवर अडचणीत सापडलेल्या काँग्रेस आघाडीला अजित सिंह यांनी यांनी साथ देण्याचे ठरविले आहे. दिल्लीत आज काँग्रेस पक्षाध्यक्षा सोनिया गांधी यांची भेट घेऊन यूपीएमध्ये सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.
काँग्रेस सरचिटणीस राहुल गांधी आणि अजित सिंह यांच्यात दोन दिवसांपूर्वीच चर्चा झाली होती. त्यावर आजच्या सोनिया भेटीने मोहोर उमटवण्यात आली. नव्या बोलणीनुसार, अजित सिंह यांचा केंद्रीय मंत्रिमंडळात समावेश करण्यात येणार आहे.
First Published: Saturday, December 10, 2011, 13:59