Last Updated: Thursday, June 28, 2012, 14:35
www.24taas.com, नवी दिल्ली भारतात अमेरिकेतील ९/११ सारखाच दहशतवादी हल्ला करण्याचा कट लष्कर-ए-तैय्यबानं आखला होता, असा धक्कादायक खुलासा दहशतवादी अबू जिंदालनं केलाय. पोलिसांनी केलेल्या चौकशीत त्यानं ही कबुली दिलीय.
भारतातील उंच इमारती आणि मोठी धरणं दहशतवाद्यांचा टार्गेटवर होती. यासाठी अबू जिंदालला विमान उडवण्याचं प्रशिक्षण देण्यात आलं होतं. अबू जिंदालचा या खुलाशानं तपास यंत्रणांची झोप उडालीय. कारण, ९/११ च्या दहशतवादी हल्ल्यात हजारो नागरिकांचा जीव गेला होता आणि भारतात अबू जिंदालचा हा कट यशस्वी झाला असता तर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी झाली असती. पोलिसांनी अबू जिंदालच्या या खुलाशानंतर देशातील उंच इमारती आणि धरणांची सुरक्षा वाढवलीय. भारतात २००८ नंतर जेवढे बॉम्बस्फोट आणि अतिरेकी कारवाया झाल्या त्या सर्व घटनांमध्य अबू हमजाच हात असल्याचा दावा महाराष्ट्र एटीएसनं केलाय.
अबू हमजा यानं विदर्भातल्या आणखी ८ तरुणांना पाकिस्तानात नेऊन दहशतवादी प्रशिक्षण दिलंय, अशी धक्कादायक माहिती एटीएसनं दिलीय. हे आठही जण सध्या भारतात आहेत आणि २००८ नंतरच्या अतिरेकी कारवायांमध्ये ते सक्रीय होते.
First Published: Thursday, June 28, 2012, 14:35