Last Updated: Thursday, June 28, 2012, 19:38
www.24taas.com, नवी दिल्ली 
महागाईचा आगडोंब पेटलेला असताना सामान्यांना थोडासा दिलासा मिळाला आहे. पेट्रोल २.४६ रू. स्वस्त होणार आहे. आज मध्यरात्रीपासून नवीन दर लागू होतील. गेले काही दिवस पेट्रोलचे दर कमी होणार अशी चर्चा सुरू होती. आज अखेर ही पेट्रोलमध्ये अडीच रूपयाची कपात करण्यात येणार आहे. पेट्रोलच्या दराबाबत तेल कंपन्यांची आढावा बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. जूनमध्येच ७.५० रूपयाची दरवाढ केली होती. आता एकूण ४.५० रूपयाची कपात झालेली आहे.
जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे भाव मोठ्या प्रमाणावर घसरले आहेत. कच्च्या तेलाचे दर ११५ डॉलरवरून थेट ९९ डॉलर प्रतिबॅरलपर्यंत खाली आले आहेत. तेल कंपन्यांनी वाढता तोटा लक्षात घेऊन २३ मे रोजी पेट्रोलचे दर तब्बल आठ रुपयांनी वाढवले होते. त्यानंतर केंद्र सरकारनं दबाव टाकल्यानंतर त्यात दोन जूनला दोन रुपयांची कपात करून ग्राहकांना थोडासा दिलासा देण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. मात्र आता पुन्हा अडीच रुपयांनी हे दर कमी करण्यात आले आहेत. तर महागाईनं उच्चांक गाठलेला असताना सामान्यांना थोडा का होईना दिलासा मिळणार आहे.
काही दिवसांपूर्वीच तेल कंपन्यांनी पेट्रोलचे दर तब्बल साडेसात रुपयांनी वाढवून जनतेला जोरदार दणका दिला होता. त्यावर संतप्त जनतेत उद्रेक झाल्याने वाढलेला दर कमी केला. पेट्रोल दरवाढीविरोधात एनडीएने बंदही पुकारला होता. त्यानंतर सरकारने दोन रूपयांनी पेट्रोलची किंमत कमी केली.
First Published: Thursday, June 28, 2012, 19:38