जवानांनी १८ नक्षलवाद्यांना केलं ठार - Marathi News 24taas.com

जवानांनी १८ नक्षलवाद्यांना केलं ठार

www.24taas.com, रायपूर 
 
छत्तीसगडमधील दंतेवाडा जंगलात सुरु असलेल्या नक्षलवादी आणि पोलिसांच्या चकमकीत १८ नक्षलवादी ठार झाले आहेत. तर ५ नक्षलवाद्यांना ताब्यात घेण्यात आलंय. यावेळी सीआरपीएफचे ६ जवानही जखमी झाले आहेत.
 
राज्य नक्षलप्रमुख अतिरिक्त पोलीस आयुक्त रामनिवास यांच्या म्हणण्यानुसार बस्तर क्षेत्रातल्या बीजापूर आणि दंतेवाडा जिल्ह्यात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक झाली. यावेळी बीजपूर जिल्ह्यातल्या बासागुडा क्षेत्रातल्या सीआरपीएफ जवानांनी १६ नक्षलवाद्यांना ठार केलंय. तर ५ जणांना जखमी केलं. यामध्ये सीआरपीएफचे ६ जवानही जखमी झाले. तर दुसरीकडे दंतेवाडा जिल्ह्यातल्या जगरगुंडा क्षेत्रात सीआरपीएफ जवानांनी २ नक्षलवाद्यांना ठार केलंय.
 
वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार अजूनही दोन्हीही ठिकाणी चकमक सुरूच आहे. घटनास्थळावर अतिरिक्त पोलीस फौजा दाखल झाल्यात. जखमी जवानांना उपचारासाठी जंगलातून बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
 
.

First Published: Friday, June 29, 2012, 13:14


comments powered by Disqus