रेल्वेचं 'तत्काळ' बुकींग 'तत्काळ'च होणार - Marathi News 24taas.com

रेल्वेचं 'तत्काळ' बुकींग 'तत्काळ'च होणार

www.24taas.com, नवी दिल्ली
 
रेल्वे प्रशासन आपल्या तत्काळ तिकीट सेवेच्या नियमांमध्ये मोठे बदल करण्याच्या विचारात आहे. तत्काळ तिकीट बुकींगच्या वेळेतही बदल होणार आहेत. रेल्वेच्या बुकींग क्लार्कला बुकींग रुममध्ये मोबाईल घेऊन जाण्याची परवानगी नसणार आहे. तसेच तत्काळ काऊंटरवर जास्त सीसीटीव्ही कॅमेरे लावले जाणार आहेत.
 
तत्काळ तिकीटांचा काळाबाजार रोखण्यासाठी वेगळं काऊंटर उघडलं जाणार आहे. रेल्वेच्या तत्काळ तिकीट योजनेला प्रवाशांचा मोठा प्रतिसाद मिळतो आहे. मात्र एजेंट्स मंडळी या योजनेत मोठ्या प्रमाणात काळाबाजार करत असल्याच्या तक्रारी होत्या. या तक्रारींची दखल घेत रेल्वे मंत्रालयानं तत्काळ तिकीट सेवेच्या नियमांमध्ये मोठ्या प्रमाणात बदल करण्याचे संकेत दिले आहेत.
 
प्रवाशांसाठी 'तात्काळ' बदल
 
- १० ते १२ या वेळेत तात्काळ तिकीटांचे बुकींग होणार
- ८ ते १२ या वेळेत एजंट बुकींग करु शकणार नाहीत
- रेल्वेच्या बुकींग क्लार्कला बुकींग रुममध्ये मोबाईल नेण्यास मनाई
- १० जुलैपासून नविन नियम लागू होणार
- काळाबाजार रोखण्यासाठी तात्काळ तिकीटांसाठी वेगळी खिडकी
- तात्काळच्या खिडकीवर जादा सीसीटीव्ही लावले जाणार
 
 
 

First Published: Friday, June 29, 2012, 20:51


comments powered by Disqus