प्रणवदा शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार? - Marathi News 24taas.com

प्रणवदा शिवसेनाप्रमुखांची भेट घेणार?


www.24taas.com, नवी दिल्ली
 
राष्ट्रपतीपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी येत्या १३  तारखेला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची भेट घेण्याची शक्यता आहे.
 
राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी युपीएचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांनी गुरुवारी अर्ज दाखल केलाय. राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीसाठी शिवसेनेनं प्रणवदांना पाठिंबा दर्शवला होता. या संदर्भात धन्यवाद देण्यासाठी ही भेट होणार असल्याचं बोललं जातंय. याशिवाय पाठिंबा दर्शवणाऱ्या मुंबईतील अन्य पक्षांच्या नेत्यांनाही प्रणवदा भेटणार आहेत. यात ते शरद पवारांचीही भेट घेण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी बैठकीसाठी पवारही शुक्रवारी मुंबईत होते.
 
.

First Published: Saturday, June 30, 2012, 09:29


comments powered by Disqus