Last Updated: Sunday, July 1, 2012, 15:44
www.24taas.com, हैदराबाद युपीएचे राष्ट्रपतिपदाचे उमेदवार प्रणव मुखर्जी यांची बैठक संपताच जुबली सभागृहाच्या गच्चीला आग लागल्याची घटना आज येथे घडली. सुदैवाने या घटनेत कोणीही जखमी झालेले नाही.
काँग्रेसच्या खासदार आणि आमदारांची मुखर्जी यांनी जुबली सभागृहात बैठक बोलविली होती. या बैठकीसाठी एआसीसीचे महासचिव गुलाम नबी आझाद, मुख्यमंत्री एन. किरण कुमार रेड्डी आणि पीसीसी प्रमुख बोच्चा सत्यनारायण उपस्थित होते.
शॉर्ट सर्किटमुळे आग लागल्याचे सांगण्यात आले. वीज अभियंत्यांनी ताबडतोबीने वीजवाहक तार कापली. त्यामुळे आगीचे स्वरूप वाढले नाही. अग्निशामक दलाचे अभियंते आणि अधिकाऱ्यांनी ताबडतोबीने घटनास्थळी धाव घेऊन आग अटोक्यात आणली.
First Published: Sunday, July 1, 2012, 15:44