Last Updated: Sunday, December 11, 2011, 18:26
झी २४ तास वेब टीम, गोवाख्यातनाम व्यंगचित्रकार मारिओ मिरांडा यांचे आपल्या राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने वयाच्या ८५ व्या वर्षी निधन झालं. गोव्यातील पणजीपासून लाउटोलिम इथे राहत्या घरी झोपेत त्यांचे निधन झालं. गोव्याची लँडस्केप आणि व्यक्तिरेखांचे आपल्या अभिजात शैलीतील जीवंत रेखाटने ही त्यांच्या व्यंगचित्रांची खासियत होय.
मारिओ मिरांडांच्या सर्वस्वी वेगळ्या शैलीमुळे त्यांची व्यंगचित्र ओळखली जातात. मारिओ मिरांडांनी आपल्या इलसट्रेशन्ससमुळे जागतिक स्तरावर स्वताची नाममुद्रा उमटवली. त्यांच्या इलसट्रेशन्समुळेच गोवा राज्याच्या संस्कृतीचा परिचय जगाला झाला. लंडन आणि लिसबन शहरांची चित्रमय प्रवासवर्णने त्यांनी रेखाटली होती. मारिओ मिरांडा यांना भारत सरकारने २००२ साली पद्मभूषण आणि १९८८ साली पद्मश्री सन्मानित करण्यात आलं.
First Published: Sunday, December 11, 2011, 18:26