प्रणव मुखर्जींच्या उमेदवारीला संगमांचा आक्षेप - Marathi News 24taas.com

प्रणव मुखर्जींच्या उमेदवारीला संगमांचा आक्षेप

www.24taas.com, नवी दिल्ली
 
प्रणव मुखर्जी यांच्या राष्ट्रपतीपदाच्या उमेदवारीला पी. ए. संगमा यांच्याकडून आक्षेप नोंदवण्यात आला आहे. मात्र त्यावर सांख्यिकी संस्थेनं खुलासा दिला आहे. प्रणव मुखर्जी यांच्याकडे लाभाचे पद असल्याची तक्रार राज्यसभा सचिवालयात करण्यात आली आहे.
 
प्रणव मुखर्जी हे भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष असल्याचं तक्रारीत म्हटलय..मुखर्जींनी 2२०जूनलाच पदाचा राजीनामा दिल्याचा खुलासा सांख्यिकी संस्थेनं केलाय. संगमा यांचे प्रतिनिधी सत्यपाल जैन यांनी ही तक्रार केली आहे.
 
प्रणव मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू नये, अशी विनंतीही पी ए संगमा यांनी केली आहे. भारतीय सांख्यिकी संस्थेचे अध्यक्ष असल्यानं प्रणवदा राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवू शकत नाही, असा युक्तीवाद पी ए संगमा यांनी केला आहे.

First Published: Monday, July 2, 2012, 16:37


comments powered by Disqus