Last Updated: Monday, July 2, 2012, 21:18
www.24taas.com, नवी दिल्ली सावधान, सध्या मिस्ड कॉल देऊन सिम कार्डाचे क्लोनिंग बनवण्याचे नवा प्रकार उघड झाला असल्याने अनेकांची धाबे दणाणली आहे. +92, #90 अथवा #09 ने सुरू होणाऱ्या नंबराने मिस्ड कॉल आला तर तो खतरनाक होऊ शकतो. तुम्ही या मिस्ड कॉलला प्रतिसाद देऊन पुन्हा तो नंबर डायल केला, तर तुमचे सिमकार्डचे क्लोनिंग होणाचा धोका आहे.
नुकत्याच जाहीर झालेल्या एका रिपोर्ट नुसार दूरसंचारच्या माध्यमातून निर्माण झालेल्या या अभिशापाचे सुमारे एक लाख लोक शिकार झाले आहेत. सिम कार्डाचे क्लोनिंग करणे खूप सोपे काम झाले आहे. +92, #90 अथवा #09 या क्रमांकाने सुरू होणाऱ्या क्रमांकावरून मिस्ड कॉल आला. आणि त्याला तुम्ही कॉल बॅक केला तर तुमच्या मोबाईल सिम कार्डाचे क्लोनिंग झटपट तयार होते.
यात मिस्ड कॉल होण्यापूर्वीच आपण हा फोन रिसिव्ह केला तर क्लोनिंग करणारा माणूस तुम्हाला आपण कॉल सेंटरमधील माणूस असल्याचे भासवतो. तसेच सेक्युरेटी चेकिंगसाठी फोन केल्याचे त्याने सांगतो. यानंतर हा तोतया तुम्हांला #90 अथवा #09 हे बटन दाबायला सांगतो.
तुम्ही त्याने सांगितल्यानुसार केल्यास तुमच्या सिमकार्डाचे क्लोनिंग होते. क्लोनिंग झाले तर तुम्ही मोठ्या संकटात सापडू शकतात. क्लोनिंग तयार करणारी टोळी आपल्या मोबाईलमध्ये येणाऱ्या माहितीचा गैरवापर करून शकतो.
अशी टोळी तुमच्या फोनचे क्लोनिंग करून कोणत्याही क्रमांकावर फोन करू शकते. तसेच या सिमचा वापर दहशतवादी कारवायांमध्ये वापर होऊ शकतो. सिमच्या क्लोनिंग संदर्भातील सूचना आणि या संदर्भातील अलर्ट दूरसंचार संचालक बीएसएनएल ब्रॉडबँडचा वापर करणाऱ्यांना दिल्या असल्याचे म्हटले जात आहे.
सूचना
मोबाईलधारकांनी मोबाईलचा वापर करताना अधिक सावधानी घेऊन अनोळखी नंबरवरून आलेले फोन स्वीकारू नका. तसेच अनोळखी नंबरला प्रतिसाद देत, पुन्हा कॉलबॅक करू नका. मोबाईलवर बँक, एटीएमकार्ड, डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड संदर्भात कोणतीही माहिती संग्रहीत करू नका.
First Published: Monday, July 2, 2012, 21:18