Last Updated: Tuesday, July 3, 2012, 14:23
www.24taas.com, नवी दिल्ली एअर इंडियाच्या वैमानिकांनी संप तब्बल ५७ दिवसांनी मागे घेतला आहे. वैमानिकांच्या संघटनेने दिल्ली उच्च न्यायालयाला संप मागे घेण्यात येत असल्याचे सांगितले.
प्रलंबित वेतन आणि भत्ते वेळेत न मिळाल्यामुळे वैमानिकांनी संप पुकारला होता. आधीच डबघाईस आलेल्या एअर इंडियाची सेवा त्यामुळे आणखी विस्कळीत झाली. विशेषतः परदेशातील उड्डाणांवर संपाचा मोठा परिणाम झाला होता. एअर इंडियाने संप बेकायदेशी ठरविला होता. त्यामुळे वैमानिकांच्या संघटनेने न्यायालयात धाव घेतली होती.
एअर इंडियाच्या व्यवस्थापनाने संपकरी वैमानिकांच्या मागण्यांवर विचार करु तसेच बडतर्फ केलेल्या वैमानिकांना पुन्हा कामावर घेण्याचे आश्वासान देण्यात आले. न्यायालयानेही संप बेकायदेशी असल्याचा निर्वाळा दिला होता. यासंदर्भात सुनावणी सुरु होती. आज वैमानिकांनी संप मागे घेत असल्याचे कळविल्याने हा तिढा मिटला आहे.
First Published: Tuesday, July 3, 2012, 14:23