नरेंद्र मोदींचा गोड 'संदेश' - Marathi News 24taas.com

नरेंद्र मोदींचा गोड 'संदेश'

www.24taas.com, अहमदाबाद
 
पंतप्रधान बनण्याची गोड स्वप्नं पाहात असणाऱ्या गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासाठी एक गोड बातमी आहे. मोदींच्या समर्थकांनी मोदींच्या या स्वप्नाला समर्पित गोड बंगाली मिठाई ‘संदेश’ तयार केली आहे. मोदींचा संदेश लोकांपर्यंत संदेशद्वारे पोहोचवण्याचा समर्थकांचा प्रयत्न आहे.
 
वृत्तानुसार गुजरात मीडिया सेलने कोलकाता कन्फेक्शनरने बनवलेला मिठाईचा बॉक्स बनलवला आहे. या बॉक्सवर ‘भविष्यातले पंतप्रधान’ असं लिहिण्यात आलं आहे. यावर नरेंद्र मोदींचा फोटो आहे. यातून मोदींना पंतप्रधान बनवण्याचा गोड संदेश दिला आहे. हा संदेशचा बॉक्स ३५ रुपयांना उपलब्ध आहे.
 
संजय जोशी आणि केशूभाई पटेल यांनी मोदींविरुद्ध बंड केल्यावर मोदींसाठी चांगली बातमी कुठलीच आली नव्हती. काँग्रेसनेही पोस्टरमध्ये ‘गँग्ज ऑफ वासेपूर’च्या धर्तीवर ‘गँग्ज ऑफ चोरपूर’ असं लिहून नरेंद्र मोदींचा फोटो लावून मेदींचं तोंड कडू केलं होतं. अशा परिस्थितीत मोदींच्या समर्थकांनी गोड संदेश देऊन मोदींना खूश केलं आहे.

First Published: Thursday, July 5, 2012, 10:03


comments powered by Disqus