शरद पवार विश्वासघातकी, 'अर्जुना'चा नेम - Marathi News 24taas.com

शरद पवार विश्वासघातकी, 'अर्जुना'चा नेम

www.24taas.com, नवी दिल्ली
 
स्वर्गीय काँग्रेस नेते अर्जुनसिंग यांनी आपल्या पुस्तकात शरद पवारांवर टीका केली आहे. शरद पवार हे विश्वास ठेवण्यायोग्य नाहीत, असं त्यांचं मत होतं. काँग्रेस पवारांसोबत संबंध पूर्णपणे कधी तोडणार याचीच अर्जुनसिंग वाट पाहात होते.
 
‘ए ग्रेन ऑफ सँड इन द ओव्हरग्लास ऑफ टाइम’ हे आपलं आत्मचरीत्र लवकरच प्रकाशित होणार आहे. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्षशरद पवार यांच्यावर कडवी टीका केली आहे.  नरसिंह राव यांच्या मंत्रिमंडळात पवार यांच्यासोबत अर्जुन सिंग यांनी काम केलं होतं. अर्जुन सिंग हे मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री होते. सोनिया गांधी यांच्या विदेशी असण्याचा मुद्दा उपस्थित झाल्यावर काँग्रेसशी जवळीक वाढवणाऱ्या पवारांवर अर्जुनसिंग नाराज होते. १९८६ साली देखील राजीव गांधी यांना पवारांपासून सावध करताना अर्जुन सिंग म्हणाले होते, की पवारांचा पुर्वेतिहास अजिबात प्रेरणादायी नाही. ते कधीही पक्षाला धोका देऊ शकतात.
 
पवारांची ही वृत्ती१३ वर्षांनी समोर आली असं अर्जुन सिंग यांनी लिहिलं आहे. काँग्रेसच्या विरुद्ध जाऊन पवारांनी नवीन पक्ष स्थापन केला. काँग्रेसची बदनामी सुरू केली. मात्र पवार काँग्रेसला देत असलेला हा अंतिम त्रास नाही. नंतरही काँग्रेसच्या गळ्यात गळा घालून काँग्रेसला पवार त्रास देतच राहातील असं भाकितही अर्जुन सिंग यांनी केलं होतं.

First Published: Thursday, July 5, 2012, 13:08


comments powered by Disqus