'गँग्ज ऑफ वासेपूर'च्या पोस्टरवर नरेंद्र मोदी! - Marathi News 24taas.com

'गँग्ज ऑफ वासेपूर'च्या पोस्टरवर नरेंद्र मोदी!

www.24taas.com, अहमदाबाद
 
गुजराथमध्ये मोदींना कितीही विरोध झाला तरी मोदींचा करीश्मा कमी होत नाही. काँग्रेस गुजराथमध्ये विरोधी पक्ष असल्यामुळे पुढच्या निवडणुकीमध्ये मोदींना हारवण्यासाठी मिळेल त्या मार्गांनी प्रयत्न करत आहे.
 
यावेळी काँग्रेसने गुजराथमध्ये गँग्ज ऑफ वासेपूरची पोस्टर्स लावली आहेत. मात्र यात एक फरक आहे. या पोस्टर्सवर नरेंद्र मोदींचा फोटो लावला आहे. आणि या पोस्टरला ‘गँग ऑफ चोरपूर’ असं नाव दिलं आहे. तसंच पुढील निवडणुकीपर्यंत जनतेला ही गँग ऑफ चोरपूर मुर्ख बनवत राहाणार आहे, असंही या पोस्टरवर लिहिलं आहे.
 
गँग्ज ऑफ वासेपूर हा सिनेमा गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला होता. या सिनेमाची कहाणी देशी गुंड-मवाली आणि अराजक यांच्याशी संबंधित आहे. या पोस्टरमार्गे काँग्रेसने मोदी शासनाला गुंडगिरीची उपमा देऊन त्याची टर्र उडवली आहे. पण, या अशा पोस्टरमुळे मोदींची प्रसिद्धी आणखी वाढत आहे.

First Published: Thursday, July 5, 2012, 16:05


comments powered by Disqus