टीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा - Marathi News 24taas.com

टीम अण्णांचा उपोषणाचा मार्ग मोकळा

www.24taas.com, नवी दिल्ली
 
अखेर टीम अण्णांच्या उपोषणाला परवानगी देण्यात आलीय. अण्णांना दिल्लीत जंतरमंतरवर २५ जुलै ते ८ ऑगस्टदरम्यान उपोषण करण्याची परवानगी दिली गेलीय. यापूर्वी पोलिसांनी परवानगी नाकारली होती.
 
गुरुवारी, ५ जुलै रोजी टीम अण्णांच्या आंदोलनाला दिल्ली पोलिसांनी परवानगी नाकारली होती. २५ जुलैपासून टीम अण्णा सदस्य जंतरमंतरवर उपोषणाला बसणार आहेत. याच दरम्यान, संसदेचे पावसाळी अधिवेशन आहे. पोलिसांनी परवानगी नाकारल्यानंतर टीम अण्णा सदस्यांनी तुरुंगातही उपोषणाची तयारी त्यांनी दर्शविली होती.
 
जंतर-मंतर हे छोटं मैदान असून मैदानावर गडबड होऊन चेंगराचेंगरी झाल्‍यास पोलिसांना लोकांना मदत करण्‍यास कठीण जाईल, असं कारण देत पोलिसांनी टीम अण्‍णांना बेमूदत उपोषणास परवानगी नाकारली होती.
 
 

First Published: Saturday, July 7, 2012, 21:32


comments powered by Disqus