Last Updated: Sunday, July 8, 2012, 12:48
www.24taas.com, बंगळुरू कर्नाटकात भाजपनं पुन्हा एकदा येडियुरप्पांपुढे सपशेल नांगी टाकली आहे.येडियुरप्पांच्या दबावापुढे झुकत भाजप अध्यक्ष नितीन गडकरींनी कर्नाटकच्या मुख्यमंत्रीपदी जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली.
उद्या विधीमंडळ पक्षनेतेपदी शेट्टर यांची निवड करून इतर औपचारीक बाबींची पूर्तता करण्यासाठी भाजप नेते राजनाथसिंग आणि अरूण जेटली बंगळुरूला जाणार आहेत. गेल्या अनेक दिवसांपासून कर्नाटकात येडियुरप्पांच्या दबावापुढे भाजपची कोंडी सुरू आहे. अखेर आज सकाळी गडकरींच्या निवासस्थानी झालेल्या बैठकीत सदानंद गौडा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा सादर केला. त्यानंतर गडकरींनी मुख्यमंत्रीपदासाठी शेट्टर यांच्या नावाची घोषणा केली. मात्र सदानंद गौडा यांच्या कामाचं कौतुकही त्यांनी केलं. तसच त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचे संकेतही दिले.
कर्नाटकचे मुख्यमंत्री सदानंद गौडा यांनी मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला. मुख्यमंत्रीपदाबाबत भाजप नेत्यांची नितीन गडकरी यांच्या निवसस्थानी बैठक सुरू आहे. या बैठकीला मुख्यमंत्री सदानंद गौडा, जगदीश शेट्टर, भाजप नेते राजनाथसिंह, अरूण जेटली उपस्थित आहेत. या बैठकीनंतर नवे मुख्यमंत्री म्हणून जगदीश शेट्टर यांच्या नावाची घोषणा होण्याची शक्यता आहे.
First Published: Sunday, July 8, 2012, 12:48