विद्यार्थीनीला मूत्र पाजणाऱ्या वॉर्डनला अटक - Marathi News 24taas.com

विद्यार्थीनीला मूत्र पाजणाऱ्या वॉर्डनला अटक

www.24taas.com, कोलकता
 
विश्वभारती विद्यापीठांतर्गत एका शाळेच्या वसतीगृहातील महिला वॉर्डनने पाचवीतल्या विद्यार्थिनीने बिछाना ओला केल्यामुळे वॉर्डनने तिला मूत्र पिण्यासाठी जबरदस्ती केल्याची माहिती उजेडात आली आहे. पीडित विद्यार्थिनीच्या पालकांनी वॉर्डनविरुद्ध बोलपूर पोलिस ठाण्‍यात तक्रार केली आहे. या प्रकरणी पोलिसांनी या वॉर्डनला सोमवारी अटक केली.
 
उमा पोद्दार असे या महिला वॉर्डनचे नाव आहे. पीडित विद्यार्थिनी पथ भवन येथील असून ती विश्वभारती विद्यापीठाच्या एका निवासी शाळेत शिकते. शनिवारी रात्री या विद्यार्थिनीने बिछाना ओला केला होता. त्याचा राग येऊन वसतीगृहाच्या महिला वॉर्डनने तिच्या तोंडावर चादर ‍‍पिळून विद्यार्थिनीला मूत्र पिण्यास मजबूर केले. अशी कठोर शिक्षापाहून विद्यार्थिनीचे पालक चांगलेच संतापले आहे. त्यांनी याबाबत संस्थाचालकांना जाब विचारला आहे. पीडीत विद्यार्थिनीच्या पालकांसह अनेक पालकांनी आपल्या मुलींना घरी नेल्या आहेत.
 
वडिलांनी त्याच रात्री मुलीला घरी आणले. ही बाब कळल्यावर संतप्त नागरिकांनी विद्यापीठाच्या आवारात गोंधळ माजवला. राष्ट्रीय बालहक्क संरक्षण आयोगानेही या प्रकरणाची दखल घेतली. तसेच या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी विद्यापीठाने चार सदस्यीय सत्यशोधन समिती नेमली असून, तिला अहवाल सादर करण्यास सांगितले आहे. 'आपण जे केले ते म्हणजे बिछाना ओला करण्याच्या वाईट सवयीवरील उपाय होता,' असे पोद्दार यांनी संबंधित मुलीच्या आईला सांगितले.

First Published: Monday, July 9, 2012, 23:53


comments powered by Disqus