Last Updated: Tuesday, July 10, 2012, 11:00
www.24taas.com, वसई वसईतल्या बाभोळा परिसरात संशयास्पद वस्तूचा स्फोट झालाय. या स्फोटात चार जण जखमी झालेत. बाटलीतल्या ज्वलनशील पदार्थाचा स्फोट झाल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे. मात्र यामागं कोणताही घातपात नसल्याचा पोलिसांनी निर्वाळा दिलाय.
आज सकाळी वसईतील बाभेळा परिसरात सलग तीन संशयास्पद वस्तूंचा स्फोट झाल्यानं नागरिकांमध्ये घबराट पसरली होती. सुत्रांच्या माहितीनुसार, एका पिशवीमध्ये तीन संशयास्पद बाटल्या सापडल्या. या बाटल्यांमध्ये स्फोटकं होती. या स्फोटात चार जण जखमी झालेत. जखमींमध्ये तीन महिलांचा समावेश आहे. यातल्या दोघांची स्थिती गंभीर असल्याचं समजतंय. मात्र दहशतवादाशी संबंध असल्याची शक्यता पोलिसांनी फेटाळून लावलीय. हा स्फोट कशामुळे झालाय याचा तपास सध्या पोलीस करत आहेत. या बाटल्यांमध्ये ज्वालाग्रही पदार्थ असल्याची प्राथमिक माहिती मिळतेय.
First Published: Tuesday, July 10, 2012, 11:00