Last Updated: Tuesday, July 10, 2012, 20:31
www.24taas.com, बंगळुरू भाजपपुढील कर्नाटकाची डोकेदुखी अजूनही संपत नाहीये. पक्षनेतृत्वानं जगदीश शेट्टर यांना मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर केला असला तरी सदानंद गौडांनी मात्र मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देण्यास टाळाटाळ करत आहेत. गौडांनी सलग दुस-या दिवशी भाजपच्या विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला दांडी मारलीय.
त्यांनी आपल्या मागण्याची यादीच पक्षापुढं ठेवलीय. गौडा यांना कर्नाटकाचे प्रदेशाध्यक्षपद हवे असून विद्यामान प्रदेशाध्यक्ष ईश्वरप्पा यांना उपमुख्यमंत्रिपदी बसवण्याची मागणी केलीय. येवढंच नव्हे तर आपल्या समर्थकांसाठी २० मंत्रिपदे पदरात पाडून घेण्याचीही तयारी त्यांनी चालवली आहे.
गौडा यांच्या निवासस्थानी समर्थकांची बैठक झाली असून ४६ विधानसभेच्या आमदारांनी आणि आठ विधान परिषदेच्या आमदारांनी हजेरी लावली. तर दुसरीकडे विधिमंडळ पक्षाच्या बैठकीला येडियुपरप्पांनी आपल्या समर्थकांसह हजेरी लावली होती. भाजपचे नेते अरुण जेटली आणि राजनाथ सिंग यांनी येडियुरप्पा आणि सदानंद गौडा यांच्या भेटी घेऊन दोघांशी स्वतंत्र चर्चा केली.
First Published: Tuesday, July 10, 2012, 20:31