Last Updated: Wednesday, December 14, 2011, 11:06
झी २४ तास वेब टीम, कर्नाटक महाराष्ट्रात घोडदौड करणारी शरद पवारांची राष्ट्रवादी काँग्रेस आता कर्नाटकात काँग्रेसला धोबीपछाड देण्याची चिन्हं आहेत. कर्नाटकात काँग्रेसचे १५ आमदार राष्ट्रवादीच्या वाटेवर असून लवकरच ते शरद पवारांची भेट घेणार आहेत.
राजकीयदृष्ट्या प्रबळ असलेले हे आमदार राष्ट्रवादीत जाण्यास इच्छुक आहेत. कर्नाटकात काँग्रेसची पिछेहाट होत असल्यानं त्यांनी नवा मार्ग पकडायचं ठरवलंय. या आमदारांपैकी मल्लिकेय गुत्तेदार आणि बी. सी. पाटील यांनी अलिकडेच बारामतीत शरद पवारांची भेट घेतली होती. अन्य आमदार आठ दिवसांनी पवारांना भेटणार आहेत.
चिक्कोडीचे आमदार प्रकाश हुक्केरी यांनी झी २४ तासला ही माहिती दिली आहे. महाराष्ट्रात महानगरपालिका निवडणुकींच्या पहिल्या टप्प्यात झालेल्या मतमोजणीत राष्ट्रवादीनं जोरदार मुसंडी मारत राज्यात सर्वाधिक नगरपालिकांवर सत्ता मिळवली असल्याने राष्ट्रवादीचं पारडं जड असल्याचं दिसून आलंय.
First Published: Wednesday, December 14, 2011, 11:06