पेट्रोलचा भडका पुन्हा.. पुन्हा - Marathi News 24taas.com

पेट्रोलचा भडका पुन्हा.. पुन्हा


झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
डॉलरचा तुलनेत रूपयांची किंमत घसरल्याने आता पुन्हा आणखी एकदा महागाईचा भडका उडण्याची शक्यता आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर येत्या शुक्रवार पासून ०.६५ पैशानी वाढणार आहे. ही दरवाढ शुक्रवारपासून लागू करण्यात येणार आहे. त्यामुळे पेट्रोलचे दर पुन्हा वाढण्याची चिन्ह निर्माण झाली आहेत. तसंच पेट्रोलवर सेस लागू करण्याची शिफारस योजना आयोगाच्या पॅनलनं सरकारला केली आहे.
 
पेट्रोलच्या दरात प्रती लिटर १.८२ रुपये वाढ करण्याचा निर्णय इंडियन ऑयल या सरकारी तेलकंपनीने ३ नोव्हेंबर रोजी घेतला होता. तत्पूर्वी इंडियन ऑइल कॉर्पोरेशन , एचपीसीएल आणि बीपीसीएल या तेलकंपन्यांनी १६ सप्टेंबर रोजी पेट्रोलच्या किमतीत ३.१४ रुपयांनी वाढ केली होती.
 
ही शिफारस मान्य केली तर पेट्रोल आणखी दोन रुपयांनी महागणार आहे. तर कार खरेदी करणंही महागण्याची शक्यता आहे. नवीन कार खरेदीवर तीन टक्के ग्रीन सेस लागू करण्याची शिफारस योजना आयोगानं केली आहे. या ग्रीन सेससह खाजगी वाहनावर वाहतूक कर वाढवण्याचीही शिफारस करण्यात आल्यानं कार खरेदी महागणार आहे. खासगी वाहनांचा कमीत कमी वापर व्हावा या हेतूसाठी ही शिफारस करण्यात आल्याचं समजतं.

First Published: Wednesday, December 14, 2011, 11:33


comments powered by Disqus