Last Updated: Thursday, July 12, 2012, 10:57
www.24taas.com, नवी दिल्ली उपराष्ट्रपतीपदासाठी हमीद अन्सारी यांना पुन्हा संधी मिळावी यासाठी पंतप्रधानांनी प्रयत्न सुरु केलेत. त्यांनी याबाबत तृणमूल काँग्रेसच्या अध्यक्षा ममता बॅनर्जी तसंच भाकप नेते ए.बी.वर्धन यांच्याशी दुरध्वनीवरून चर्चा केली.
बॅनर्जी यांच्याशी झालेल्या चर्चेबाबत दोन्ही बाजूंकडून कुठलही निवेदन देण्यात आलेलं नाही.मात्र ममतांनी उपराष्ट्रपतीपदासाठी दोन नावं सुचवलीत. उपराष्ट्रपताच्या उमेदवारीबाबत निर्णय घेण्यासाठी युपीएची 14 जुलैला बैठक होतेय. त्यामध्ये सहभागी होण्याचा निर्णय तृणमूलनं घेतलाय.
ब-याच कालावधीनंतर तृणमुल युपीएच्या बैठकीत सहभागी होत आहेत. उपराष्ट्रपतीपदासाठी 7 ऑगस्टला निवडणूक होतेय. भाकपनं 18 जुलैला पक्षाची याबाबत निर्णय घेण्यासाठी बैठक बोलावलीय
First Published: Thursday, July 12, 2012, 10:57