Last Updated: Thursday, July 12, 2012, 16:32
www.24taas.com, नवी दिल्ली 
काँग्रेसचे युवराज राहुल गांधींना एका महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासंबंधी ऑफर दिली आहे. जंतर-मंतरवर आंदोलनाला बसलेल्या या महिलेने आपल्या मुलीच्या लग्नासाठी राहुल गांधींना १५ करोड हुंडा देण्यास तयार झाल्याचे समजते.
शांती शर्मा असं या महिलेचं नाव आहे. शांती देवाकडे प्रार्थना करीत आहेत की त्यांच्या मुलीसाठी नवरा मुलगा मिळावा. शांती राहुल गांधीशिवाय कोणालाच आपल्या जावयाच्या जागी पाहू इच्छित नाही. राहुल गांधी हाच माझा जावई व्हावा अशी त्यांची इच्छा आहे.
तर हीच महिला आपल्या संपत्तीतील हिस्सा आपल्या सासरकडून मागते आहे. तर पोलिसाचं म्हणणं आहे की, ही महिला विक्षिप्त आहे. त्यामुळे आता ही महिला गेले अनेक दिवस मौनव्रत करते आहे. तिचे हे व्रत कधी सुटणार याकडेच साऱ्यांचे लक्ष लागले आहे.
First Published: Thursday, July 12, 2012, 16:32