डिझेल दराचा उडणार भडका - Marathi News 24taas.com

डिझेल दराचा उडणार भडका

www.24taas.com, नवी दिल्ली
 
राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनंतर डिझेलच्या किमतीत वाढ होण्याची शक्यता असल्याचं पीटीआयनं म्हटलंय. दरवाढ अटळ आहे, मात्र ती कधी होणार याची तारीख आत्ताच सांगता येणार नसल्याचं सूत्रांनी स्पष्ट केलंय.
 
मागील वर्षी २५ जूनला डिझेलच्या किमती वाढल्या होत्या. त्यानंतर वर्षभर डिझेलच्या किमतीत कोणतीही दरवाढ झालेली नाही. सरकारला सध्या एका लिटर डिझेलमागे दहा रूपयांचा तोटा सहन करावा लागतोय.
 
डिझेलची किंमत वाढली तर महागाई मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे.  आधीच अनेक राज्यात मान्सूनने हुलकावणी दिली आहे. त्यात डिझेलचे दर वाढले तर  जीवनावश्यक वस्तुंच्या किंमती आकाशाला भिडतील.  यंदा २३ टक्के कमी पाऊस झाला आहे. हा मुद्दा देखील महागाईच्या आगीत तेल ओतण्यासारखा आहे.
 
अपेक्षीत पाऊस न झाल्यामुळे भाजीपाल्याचे भाव आधीच गगनाला भिडले आहेत. त्यात डिझेल १० रुपये महाग झाल्यास त्याचा परिणाम भाज्यांच्या भाववाढीवर होईल. साधारण ३० टक्के भाववाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांचे रोजचे जगणे महाग होणार आहे.

First Published: Thursday, July 12, 2012, 19:19


comments powered by Disqus