बलात्कार, महिलेची निवस्त्र धिंड... काय चाललंय? - Marathi News 24taas.com

बलात्कार, महिलेची निवस्त्र धिंड... काय चाललंय?

www.24taas.com, मुंबई
 
देशभरात पुन्हा एकदा महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आलाय. स्वतंत्र भारतात मोकळा श्वास घेणे आणि फिरणं गुन्हा आहे की काय असा प्रश्न उपस्थित करणा-या घटना समोर आल्यात.
 
आसामच्या गुवाहाटीपासून चंद्रपूरपर्यंत घडलेल्या या घटनांमुळं आमच्या सुरक्षेचा काय असा सवाल महिलांकडून उपस्थित करण्यात येतोय. देशभरात आसामच्या गुवाहाटीतल्या घटनेमुळं तर संतापाची लाट उसळलीय... गुवाहाटीत गजबजलेल्या ठिकाणी एका मुलीवर विनयभंगाच्या घटनेवरून खळबळ उडालीय.
 
या प्रकरणी चौघांना अटक करण्यात आलीय. प्रसारमाध्यमांमध्ये हे वृत्त आल्यानंतर केंद्रानंही या घटनेचा आसाम सरकारकडून तपशील मागवलाय...तर नववीत शिकणा-या एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याची घटना चंद्रपुरात घडलीय.. अशीच काहीशी घटना उस्मानाबादेतही घडली...रोडरोमियोच्या केलेल्या छेडछाडीमुळं बदनामीच्या भितीनं एका मुलीनं उस्मानाबादमध्ये स्वतःला जाळून घेतलंय.....
 
 
 

First Published: Saturday, July 14, 2012, 07:54


comments powered by Disqus