कलमाडींच्या ऑलिम्पिकवारीला क्रीडामंत्र्यांचा ब्रेक - Marathi News 24taas.com

कलमाडींच्या ऑलिम्पिकवारीला क्रीडामंत्र्यांचा ब्रेक

www.24taas.com, नवी दिल्ली
 
इंडियन ऑलिम्पिकचे माजी अध्यक्ष सुरेश कलमाडी यांना ऑलिम्पिकचं निमंत्रण कोणी दिलं, याबाबत केंद्रीय क्रीडामंत्री अजय माकन यांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय. कलमाडी हे भारतीय डेलिगेशनचा हिस्सा असू शकत नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलंय.
 
आपण इंटरनॅशनल असोसिएशन ऑफ अॅथलेटिक्स फेडरेशन काऊन्सिलचे सदस्य असून आपल्याला लंडनमध्ये होणाऱ्या ऑलिम्पिक स्पर्धेसाठी जाण्याची परवानगी मिळावी, अशी याचिका सुरेश कलमाडी यांनी सीबीआय कोर्टाकडे केली होती. या याचिकेला हिरवा कंदील दाखवत दिल्ली कोर्टानं कलमाडींना २६ जुलै ते १३ ऑगस्ट दरम्यान कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला जाण्यासाठी शुक्रवारी परवानगी दिली होती. पण, सुरेश कलमाडी यांना कोणी निमंत्रण दिलं, याबाबत चौकशी करणार असल्याचं क्रीडामंत्र्यांनी म्हटलंय. कलमाडींना भारतीय डेलिगेशनचा हिस्सा मानण्यात येणार नाही, असं त्यांनी स्पष्ट केलंय. ज्या व्यक्तीवर घोटाळ्यांचा आरोप आहे, ज्याच्याविरुद्ध सीबीआयची चौकशी सुरु आहे, ती व्यक्ती भारतीय डेलिगेशनचा हिस्सा बनूच शकत नाही, असं त्यांनी यावेळी स्पष्ट केलंय. क्रीडामंत्र्यांनी कलमाडींना लंडन ऑलिम्पिकला निमंत्रण देण्यावरच प्रश्नचिन्ह उपस्थित केल्यामुळे कलमाडींच्या लंडन दौऱ्यावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालंय.
 
 

First Published: Saturday, July 14, 2012, 08:47


comments powered by Disqus