Last Updated: Sunday, July 15, 2012, 14:36
www.24taas.com, शिमला हिमाचल प्रदेशात बस दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात पंधरा जण ठार आणि १८ जण जखमी झाले आहेत. या बसमधून भाविक देवदर्शनासाठी गेले होते.
या बसमधील सर्व भाविक उत्तर प्रदेशातील कानपूर शहरातील रहिवासी होते. एका खासगी बसने अमरनाथहून परतत असताना हा अपघात झाला. शिमलापासून २५० किमी अंतरावर असलेल्या कांगरा गावाजवळ २५० फूट खोल दरीत ही बस कोसळली.
जखमींना टांडा येथील राजेंद्रप्रसाद वैद्यकीय महाविद्यालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. ही बस चामुंडा देवी मंदीराहून ज्वालाजी मंदीराकडे जात होती. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि स्थानिक गावकऱ्यांनी मदतकार्य करून अनेकांचा जीव वाचविला.
First Published: Sunday, July 15, 2012, 14:36