Last Updated: Tuesday, July 17, 2012, 17:05
www.24taas.com, इंदौर 
आपल्या पत्नीसोबत एखादा व्यक्ती किती क्रूरतेने वागू शकतो. याचं उदाहरण आपल्यासमोर आलं आहे. त्या क्रूर व्यक्ती पोलिसांनी अटक केली आहे. ही व्यक्ती आपल्या पत्नींच्या गुप्तांगाला टाळं लावून ठेवायचा. कारण की त्याला आपल्या पत्नीबद्दल नेहमीच संशय येत होता. अगांवर शहारे उभे राहतील अशा विचित्र गोष्टी तो आपल्या पत्नीसोबत करीत होता, त्याच्या पत्नीला तो इतक्या क्रूरपणे झळत होता की शेवटी तिने आत्महत्या करण्याचा प्रयत्न करीत होता.
त्याच्या पत्नीने विष खाण्याचा प्रयत्न केला. जेव्हा तिला दवाखान्यात नेण्यात आलं तेव्हा डॉक्टर तिची तपासणी करताना त्यांना आढळून आलं की, तिचा पती तिच्या गुप्तांगाला टाळं लावून ठेवीत असे. त्याच्या या अशा वागण्यामुळे त्याच्या पत्नीने आत्महत्येचा प्रयत्न केला होता. आणि त्याला पोलिसांनी काल अटक केली. त्याच्याकडून अनेक गोष्टींची चौकशी करण्यात येत आहे. आरोपी एका गॅरेजमध्ये काम करतो.
आपल्या पत्नीच्या गुप्तांगावर त्याने एक प्रकराचा खड्डा केला. जेणेकरून त्याला त्याच्या पत्नीच्या गुप्तांगावर टाळं लावता येईल. आणि गेल्या अनेक वर्षापासून हा सारा प्रकार सुरू असल्याचे समोर आलं आहे. पोलिसांचा चौकशीत असे समोर आले आहे की, त्याला त्याच्या पत्नीच्या चरित्रावर संशय होता. आणि त्यामुळेच तो त्याचा पत्नीसोबत असा वागत होता.
First Published: Tuesday, July 17, 2012, 17:05