Last Updated: Thursday, December 15, 2011, 10:21
झी २४ तास वेब टीम, प. बंगाल 
पश्चिम बंगालच्या दक्षिण २४ परगणा जिल्ह्यात विषारी दारुमुळं १२६ जणांचे मृत्यू झाले आहेत. याचा बाबतीत गुरवारी सात लोकांना अटक करण्यात आली आहे. या विषारी दारूमुळे आज तब्बल ४० लोकांनी आपला जीव गमावला आहे. त्यामुळे आज प. बंगाल सरकारने यासाठी सीआईडीला चौकशीचे आदेश दिले आहेत. तर अजूनही १०० जणांवर हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु आहेत.
जिल्ह्यातल्या उष्टी, मोगराहट आणि मंदिर बाजार परिसरात शेकडो लोक दारु प्याल्यानं आजारी पडले.त्यांतील ६० जणांचा मृत्यू झाला आहे. घटनेनंतर संतप्त झालेल्या लोकांनी देशी दारु बनवणाऱ्या कारखान्यावर हल्ला करुन मोडतोड केली. याप्रकरणी पोलिसांनी ४ जणांना अटक केली आहे.ममता बॅनर्जी यांनी विषारी दारु विकणाऱ्यांविरोधात कडक कारवाईचे आश्वासन दिलं असून मृतांच्या कुटुंबियांना मदतीची घोषणा केली आहे.
काही दिवसांपूर्वीच कोलकात्यातील एएमआरआय हॉस्पिटलला लागलेल्या आगीत ९१ लोकांनी आपले प्राण गमावले होते. त्यानंतर बंगालला सलगा दुसऱ्या मोठ्या दुर्घटनेला सामोरं जावं लागलं आहे.
First Published: Thursday, December 15, 2011, 10:21