लोकपाल बैठक निष्फळ, सरकारची धावपळ - Marathi News 24taas.com

लोकपाल बैठक निष्फळ, सरकारची धावपळ

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली
 
लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरल्यानंतर सरकारची धावपळ सुरू झालीय. सरकारकडे खुपच कमी वेळ असल्यानं लोकपाल बिल मंजुर होण्याबाबत केंद्रीय मंत्री पवन बन्सल यांनी साशंकता व्यक्त केलीय.
 
लोकपाल बिलातील मुद्यांवर सर्वपक्षीय नेत्यांमध्ये मतभेद असल्याचंही सरकारनं मान्य केलयं. त्यामुळे येत्या हिवाळी अधिवेशनात लोकपाल बिल मंजूर होणार का ? याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झालयं. मात्र येत्या दोन-तीन दिवसात बिल मंजूर करण्याचा प्रयत्न असल्याचा दावा सरकारानं केलाय. काल लोकपालच्या भविष्याबाबत निर्णय घेण्यासाठी बोलावण्यात आलेली सर्वपक्षीय बैठक निष्फळ ठरली.
 
शिवसेनेनं लोकपालला विरोध करत स्वतंत्र लोकपालची गरजच काय, असा प्रश्न या बैठकीत विचारला. कनिष्ठ कर्मचा-यांच्या मुद्द्यावरही बैठकीत मतभेद समोर आले. सीबीआय आणि पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत यावेत, अशी मागणी भाजप आणि डाव्यांनी केली. तर पंतप्रधान लोकपालच्या कक्षेत नको, अशी भूमिका रामविलास पासवान यांनी घेतली. त्यामुळे लोकपाल बिल पुन्हा एकदा अडचणीत सापडलंय.

First Published: Thursday, December 15, 2011, 10:21


comments powered by Disqus