Last Updated: Thursday, July 19, 2012, 16:12
www.24taas.com, कोलकाता 
राज्यसह देशभरात महिलांवर अत्याचाराचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे. काही दिवसापूर्वी गुवाहटीमध्ये मुलीचे भररस्त्यात कपडे फाडण्यात आले होते. त्या प्रकरणाला काही दिवस नाही उलटत तोच कोलकात्याच्या भररस्त्यात एका गावगुंडाने जबरदस्तीने मुलीचे चुंबन घेण्याचा प्रयत्न केल्याचा समोर आले आहे. त्या मुलीने संबंधित मुलावर विनयभंगाचा आरोप केला आहे.
या प्रकरणी पोलिसांनी संदीप सिंह नावाच्या युवकाला अटक केली आहे. अमेरेस्ट स्ट्रीटवर रात्री ८ वाजताच्या सुमारास संदीप सिंह आणि त्याच्या काही मित्रांनी पीडित मुलीचा पाठलाग केला. आनंद मोहन कॉलेजमध्ये बी.कॉमच्या तृतीय वर्षाचा विद्यार्थी संदीपने मुलीला भररस्त्यात पकडले आणि तिचे चुंबन घेतले. यावेळी त्याच्या सहकरी मित्रांनीही त्याला मुलीला पकडून ठेवण्यास मदत केली.
पीडित मुलीने मदतीसाठी आरडाओरड केली मात्र कोणीही तिची मदत केली नाही. तिने स्वतःला त्यांच्या तावडीतून सोडवून घेतले आणि घर गाठले. त्यानंतर पीडित मुलगी आणि तिच्या आईने पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी सांगितले की, संदीपला अटक करण्यात आली असून त्याच्या मित्रांचा शोध सुरु आहे.
First Published: Thursday, July 19, 2012, 16:12