Last Updated: Friday, July 20, 2012, 16:55
www.24taas.com, नवी दिल्ली भारताच्या पहिल्या महिला राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील या लवकरच आपल्या पदावरून पायउतार होणार आहेत. २३ जुलै रोजी संसदेच्या दोन्ही सभागृहाचे सदस्य राष्ट्रपतींना निरोप देणार आहेत.
राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांनी आपला कार्यकाल पूर्ण केल्यानंतर संसदेच्या ऐतिहासिक केंद्रीय कक्षात सोमवारी सायंकाळी एका विशेष समारंभाचं आयोजन करण्यात आलंय. या समारंभासाठी उपराष्ट्रपती हमीद अन्सारी, पंतप्रधान मनमोहन सिंग, मंत्रिमंडळाचे सदस्य आणि विरोधी पक्षांचे वरिष्ठ नेतेही उपस्थित राहणार आहेत. यावेळी संसदेच्या सदस्यांची सही असलेला एक स्क्रोल आणि सन्मानचिन्ह भेट देण्यात येणार आहे.
.
First Published: Friday, July 20, 2012, 16:55