Last Updated: Friday, July 20, 2012, 21:29
www.24taas.com, श्रीनगरअमरनाथ यात्रेत भाविकांच्या मृत्यूचे प्रकरण आता कुठे थंड होत असताना एका महिला भाविकाचा अश्लील एमएमएस बनविण्याचा एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पंजाबच्या एका महिलेने श्रीनगर पोलिसांमध्ये केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी दोघा सेवेदारांना ताब्यात घेतले आहे.
गेल्या ११ जुलै रोजी ही महिला बालटाल येथील हेलिपॅड जवळ असलेल्या लंगर शिबिरात गेली होती. हे लंगर जालंधरच्या श्री अमरनाथ (बी) ट्रस्टने लावले होते. या शिबिरात लोखंडी पत्राचे एक स्नानगृह बांधण्यात आले होते. लोखंडी पत्राला छिद्र पाडून काही तरूणांनी या महिलेचे अंधोळ करतानाचे मोबाईलवर चित्रीकरण केल्याचा दावा या महिलेने आपल्या तक्रारीत केला आहे. या महिलेने आरडाओरड केल्यानंतर सापडले जाण्याच्या भीतीने तरूण त्या ठिकाणाहून फरार झाले.
महिलेच्या तक्रारीनंतर पोलिसांनी या लंगरच्या दोन सेवेदारांना ताब्यात घेतले आहे. या महिलेचा व्हिडिओ तयार करण्यात येत होता. या दोघांचे मोबाईल ताब्यात घेतले असून प्राथमिक तपासात व्हिडिओ सापडला नाही. मोबाईल फॉरेन्सिक तपासासाठी पाठविण्यात येणार आहे.
First Published: Friday, July 20, 2012, 21:29