मनमोहन सिंग तर 'जोकर' - राजीव गांधी - Marathi News 24taas.com

मनमोहन सिंग तर 'जोकर' - राजीव गांधी

www.24taas.com, बंगळुर 
 
पंतप्रधान  मनमोहन सिंग अर्थतज्ञ म्हणून ज्यांनी आपली ओळख निर्माण केली होती. त्याच मनमोहन सिंग यांना खुद्द  माजी पंतप्रधान राजीव गांधी ह्यांनी 'जोकर' असे संबोधले होते. सध्या चहूकडून टीकेचे लक्ष्य झालेले पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची माजी पंतप्रधान राजीव गांधीही एकदा ‘जोकर’ अशी संभावना केली होती.
 
त्याचा गौप्यस्फोट तत्कालीन गृह सचिव सी. जी. सोमय्या यांनी ‘द ऑनेस्ट ऑलवेज स्टॅण्ड अलोन’ या आत्मचरित्रात केला आहे. राजीव गांधी आणि मनमोहन सिंग यांच्यातील अनेक किस्से त्यांनी या पुस्तकात रंजकपणे सांगितले आहेत. देशाच्या विकासाबद्दल राजीव आणि मनमोहन यांच्या कल्पना भिन्न होत्या. राजीव यांना पाश्‍चात्य देशांप्रमाणे येथे सर्व सुखसोयी राबवायच्या होत्या तर मनमोहन वास्तव त्यांना निदर्शनास आणून देऊ इच्छित होते.
 
देशात वेगवान रेल्वे, हवाई तळ, शॉपिंग मॉल्स, विशाल निवासी संकुले बांधण्याची राजीव गांधी यांची इच्छा होती, पण मनमोहन यांच्या टीमने घेतलेल्या निर्णयाने राजीव गांधी इतके नाराज झाले की त्यांनी जाहीरपणे मनमोहन व त्यांच्या टीमला 'जोकर' म्हणून संबोधले होते. प्रशासनात जोकर्सचा ताफा आहे. ज्याला आधुनिक कल्पना कशाशी खातात हे ही माहिती नाही, असे संतप्त उद्गार राजीव गांधी यांनी पत्रकारांशी बोलताना काढले होते.

First Published: Saturday, July 21, 2012, 12:34


comments powered by Disqus