मी मज हरपून बसलो रे- हरविंदर - Marathi News 24taas.com

मी मज हरपून बसलो रे- हरविंदर

झी २४ तास वेब टीम, नवी दिल्ली 
 
शरद पवार यांच्यावर हल्ला करताना माझे भान हरपले होते, असा दावा आता हरविंदर सिंग याने केला आहे. हरविंदर सिंग याने गेल्या महिन्यात केंद्रिय कृषी मंत्री शरद पवार यांच्यावर हल्ला केला होता.
आज त्याला न्यायालयात हजर करण्यापूर्वी हरविंदर म्हणाला, पवार यांच्यावर हल्ला करताना आपली मती भ्रष्ट झाली होती. माझे मानसिक संतुलन ढळले होते.
दिल्लीच्या सत्र न्यायालयात हजर राहण्यापूर्वी त्याने जामीन अर्ज दाखल केला आहे.  जामीन अर्जावर शुक्रवारी सुनावणी होण्याची शक्यता आहे. हरविंदर सिंग याने दिल्लीतील एनडीएमसी येथे शरद पवार एका कार्यक्रमादरम्यान हल्ला केला होता. यासाठी त्याच्यावर कारवाई करण्यात आली आहे. यापूर्वी हरविंदरने माजी दूरसंचार मंत्री सुखराम यांच्यावरही हल्ला चढवला होता.

First Published: Thursday, December 15, 2011, 18:19


comments powered by Disqus