पाच लाख कमवा, आता आयकरची काळजी नाही - Marathi News 24taas.com

पाच लाख कमवा, आता आयकरची काळजी नाही

www.24taas.com, नवी दिल्ली
 
आयकर म्हटलं की सर्वसामान्यांना चांगलाच घाम फुटतो.. जेमतेम काही लाख वार्षिक उत्पन्न असणाऱ्या सर्वसामान्यांना मात्र आता एक खुशखबर आहे. पाच लाखांपर्यंत एकूण वार्षिक उत्पन्न असलेल्या पगारदारांना यंदापासून आयकर विवरणपत्र दाखल करण्याची गरज नसल्याचे वित्तमंत्रालयाने म्हटले आहे.
 
पगारदार व्यक्तीचे एकूण उत्पन्न ५ लाखांपेक्षा अधिक नसेल आणि २०१२-१३ वर्षात बँकेतील बचत खात्यावर मिळणारे वार्षिक व्याज १० हजार रुपयांपेक्षा कमी असेल, तरच ही सवलत लागू राहणार आहे. कपात केलेला कर परत मिळवण्यासाठी (रिफंड) विवरण पत्र दाखल करणे गरजेचे आहे. विवरणपत्र दाखल करण्याची अंतिम तारीख ३१ जुलै २०१२ आहे.
 
फॉर्म १६ गरजेचा : बँक डिपॉझिटसह इतर सर्व स्रोतांतून वार्षिक मिळकत पाच लाखांपेक्षा अधिक नसलेले देशात सुमारे 85 लाख कर्मचारी आहेत. मात्र नोकरीदाता, कंपनीकडून कर कपातीचे फॉर्म-16 मिळणार्‍या करदात्यांनाच ही सवलत लागू असेल.
 
 

First Published: Saturday, July 21, 2012, 15:35


comments powered by Disqus