Last Updated: Monday, July 23, 2012, 13:39
www.24taas.com, कानपूर सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेतील कॅप्टन लक्ष्मी सहगल (९७ ) यांचे कानपूरमध्ये ११.२० मिनिटाने निधन झाले. हदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना गुरुवारी कानपूर मेडिकल सेंटर रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याचा शव मेडिकल कॉलेजला दान करण्यात आला आहे.
सहगल यांची प्रकृती अधिकच बिघडल्याने शुक्रवारपासून त्यांना कृत्रिम श्वासोच्छवास देण्यात येत होता. त्यातच आज त्यांची प्राणज्योत मालवली. माकपा महासचिव प्रकाश करात, वरिष्ठ नेता वृंदा करात यांनी रूग्णालयात धाव घेतली आहे.
व्यवसायाने डॉक्टर असलेल्या सहगल यांनी वैद्यकीय क्षेत्रात काम करत असताना सामाजिक क्षेत्रातही भरीव काम केले. या कामाबद्दल त्यांना १९९८ मध्ये पद्मविभूषण पुरस्काराने गौरविण्यात आले होते. १९७१ मध्ये कॅप्टन सहगल यांनी कम्युनिस्ट पक्षा(एम)मध्ये प्रवेश केला. तसेच, त्यांनी राज्यसभेचे सदस्यत्वही स्वीकारले. याचदरम्यान बांगलादेशावर आलेल्या संकटाच्या काळात त्यांनी बचावकार्य केले आणि वैद्यकीय सेवा पुरविल्या. सहगल यांच्या पश्चात दोन मुली आहेत.
व्हिडिओ पाहा..
First Published: Monday, July 23, 2012, 13:39