Last Updated: Monday, July 23, 2012, 15:57
www.24taas.com, कुशीनगर उत्तर प्रदेशात पोलिसांनीच महिला बळजबरीने दारू पाजून सामूहिक बलात्कार केल्याची घटना कुशीनगर जिल्हात खड्डा पोलीस ठाण्यात घडली. या घटनेमुळे तीव्र संताप व्यक्त होत आहे.
कायद्याचे रक्षक झाले भक्षक. हा प्रत्यय आला आहे उत्तरप्रदेशमध्ये कुशीनगरात. एका महिलेला नोकरी देण्याचे आमिष विजय वर्मा या पोलिसांने दिले होते. नोकरीच्या आशेने आलेल्या याच महिला विजय आणि त्याच्या सहकार्यानी पोलीस ठाण्यात दारू पाजली. पोलीस ठाण्यातील एका खोलीत नेऊन जबरदस्ती केली. त्यानंतर माझ्यावर या खोलीत सामूहिक बलात्कार केला, असे या महिलेने तक्रारीत म्हटले आहे.
१७ जुलैला पोलीस विजय वर्मा यांने नोकरी देतो म्हणुन एका महिलेला पोलीस ठाण्यात बोलावले होते. ही महिला आली असता तिला बळजबरीने दारु पाजली आणि एका खोलीत पोलिसांनी सामुहिक बलात्कार केला गेला, असा आरोप या पिढीत महिलेने केला आहे. पोलीस चौकीदार विजय वर्मा आणि विरेन्द्र कुमार यांच्यावर कारवाई करण्यात आली, अशी माहिती पोलीस सूत्रांनी दिली. या घटनेची चौकशी सुरू असल्याची माहिती पोलीस आधिकारी विनोद कुमार यांनी दिली.
First Published: Monday, July 23, 2012, 15:57