पवार म्हणतात 'वेळ' संपली, 'हाता'ची सोडणार साथ? - Marathi News 24taas.com

पवार म्हणतात 'वेळ' संपली, 'हाता'ची सोडणार साथ?

www.24taas.com, नवी दिल्ली
 
काँग्रेस-राष्ट्रवादीतील तणावाच्या पार्श्वभूमीवर केंद्रातून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडण्याची शक्यता आहे. तसचं युपीला बाहेरुन पाठिंबा देण्याबाबतही राष्ट्रवादीच्या हालचाली सुरु आहेत. आज झालेल्या बैठकीत याबाबत तसा निर्णय झाल्याचे सूत्रांकडून समजते.
 
तसचं मागण्या मान्य होईपर्यंत कोणत्याही सरकारी समारंभात सामील होणार नसल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येते आहे. यूपीए सरकारमधून राष्ट्रवादी काँग्रेस बाहेर पडण्याची शक्यता आहे. पण राष्ट्रवादी काँग्रेस यूपीएला बाहेरुन पाठिंबा देईल, असं पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी सुचवल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
 
कॅबिनेटच्या बैठकीत पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या बाजूच्या खुर्चीवर कोण बसणार? यावरून हा सगळा वाद उफाळून आला आहे. प्रणव मुखर्जींच्या नंतर ए के. अॅन्थोनी की शरद पवार? हे मनमोहन सिंग यांच्या अनुपस्थितीत सरकार चालवणार? आणि यावरूनच युपीएमध्ये वाद सरू असल्याचे समजते.
 
 
 

First Published: Monday, July 23, 2012, 16:50


comments powered by Disqus