Last Updated: Monday, July 23, 2012, 23:19
www.24taas.com, नवी दि्ल्ली 
महाराष्ट्रातील खान्देश कन्या आणि राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांना सोमवारी संसद सदस्यांनी सन्मानाने निरोप दिला. संसदेच्या सेंट्रल हॉलमध्ये आयोजित एका कार्यक्रमात प्रतिभा पाटील यांना संसदेतर्फे सन्मानित करण्यात आले.
कार्यक्रमाला पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्यासह अन्य दिग्गज नेत्यांची उपस्थिती होती. विशेष म्हणजे यूपीए सरकारवर सध्या नाराज असलेले शरद पवार हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते.
लोकसभा अध्यक्षा मीरा कुमार यांनी प्रतिभा पाटील यांना सन्मानचिन्ह देऊन त्यांचा गौरव केला. प्रतिभा पाटील यांचा जळगाव ते राष्ट्रपतीभवन प्रवास त्यांनी सांगितला. त्यांच्या कामाचा गौरव केला.
First Published: Monday, July 23, 2012, 23:19