Last Updated: Monday, July 23, 2012, 23:29
www.24taas.com 
प्रेम करणं हे पाप आहे का? असाच प्रश्न आता प्रेमी युगुलाला पडला असणार? कारण एका प्रेमी जोडप्याला झोडपून काढत चार तास झाडाला बांधून ठेवलं. हे गावकरी एवढ्यावरच थांबले नाहीत तर त्यांनी या दोघांचे केस कापून टाकले व नंतर विवस्त्र करुन त्यांना झाडाला बांधले. याबाबत सूचना मिळताच सराडाचे पोलिस अधिकारी घटनास्थळी रवाना झाले. मात्र गावक-यांनी पोलिसांना तिथे येण्यास मज्जाव केला.
अखेर पोलिसांनी लाठीमार व बंदुकींच्या धाकाने या प्रेमी जोडप्याला ताब्यात घेतले. तरीही गावक-यांनी पोलिसांशी वाद घालत हस्तक्षेप न करण्यास धमकावले. तरीही पोलिसांनी न ऐकता या जोडप्याला झाडाला बांधलेले सोडून जीपमध्ये टाकून ठाण्याकडे घेऊन निघाले असता गावक-यांनी पोलिसांच्या गाड्यावर मोठ्या प्रमाणात दगडफेक केली.
त्यानंतर संबंधित महिलेला व पोलिसांनाही गावक-यांनी चांगलाच चोप दिला. अखेर वरिष्ठ पोलिसांनी गावक-यांशी कशी तरी चर्चा करुन त्या महिलेला त्यांच्या तावडीतून पोलिस ठाण्यात आणले. त्यानंतर गावकरी आणि पोलिसाची रात्री उशीरापर्यंत यावर वाद चालू होता. जात पंचायतीने पोलिसांनी हस्तक्षेप करु नये व आमच्या वैयक्तिक प्रश्नांत लक्ष घालू नये, अशी मागणी केली. हे प्रकरण आमचे आम्ही निस्तारण्यास सक्षम असल्याचा दमही पंचायतीने पोलिसांना भरला.
First Published: Monday, July 23, 2012, 23:29