Last Updated: Wednesday, July 25, 2012, 08:28
www.24taas.com, नवी दिल्ली प्रणव मुखर्जी आज राष्ट्रपतीपदाची शपथ घेणार आहेत. भारताचे सरन्यायाधिश एच. एस. कपाडिया प्रणव मुखर्जी यांना शपथ देतील.
प्रणव मुखर्जी सकाळी ९.३० वाजता राजघाटला भेट देणार आहेत. तर शपथविधीचा कार्यक्रम सकाळी ११.३० वाजता होणार आहे. नव्या राष्ट्रपतींना २१ तोफांची सलामी दिली जाणार आहे. मुखर्जी यांनी राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत पी. ए. संगमा यांचा दणदणीत पराभव करत विजय मिळवलेला आहे. मुखर्जींच्या रुपानं राष्ट्रपतीपदाचा मान पहिल्यांदाच बंगालला मिळालाय.
First Published: Wednesday, July 25, 2012, 08:28